Jalsampada Vibhag Pune Bharti 2025 राज्यातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जलसंपदा विभागातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिप (प्रशिक्षण) उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बांधकाम प्रकल्प, उपसा सिंचन योजना, जलनियोजन, जल हवामान, पर्जन्य, सिंचनव्यवस्थापन, प्रकल्प आरेखन अशा अनेक कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
राज्यातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जलसंपदा विभागातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी इंटर्नशिप (प्रशिक्षण) उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बांधकाम प्रकल्प, उपसा सिंचन योजना, जलनियोजन, जल हवामान, पर्जन्य, सिंचन व्यवस्थापन, प्रकल्प आरेखन अशा अनेक कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. नाशिकमधील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी), मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (सीडीओ) आणि जलविज्ञान व धरण सुरक्षितता संघटना (डीएसओ) या कार्यालयासह इतर क्षेत्रीय कार्यालयांतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
राज्यातील मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाच्या (बी. ई. किंवा बी. टेक.) तिसऱ्या किंवा चौथ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप उपक्रमाचा लाभ घेता येईल. याचबरोबर राज्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवीच्या (एमई किंवा एमटेक) पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. इंटर्नशिप उपलब्ध करून देण्याची जबाबदारी मेरीच्या महसंचालकांची असणार आहे. विभागामध्ये राबविल्या जाणाऱ्या इंडर्नशिपचे स्वरुप आणि कालावधीबाबतचाही निर्णय मेरीचे महासंचालक घेणार आहेत. इंटर्नशिप समाप्तीच्या अखेरच्या आठवड्यात प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाचा अहवाल संबंधित कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक असणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना इंटर्नशिपचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा