वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है’, ब्रेकअपचा असा राग काढला की एक्स बॉयफ्रेंडही चक्रावून गेला; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

वो स्त्री है, वो कुछ भी कर सकती है’, ब्रेकअपचा असा राग काढला की एक्स बॉयफ्रेंडही चक्रावून गेला; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

Break up Viral video : फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना असं म्हणतात. २०२५ची सुरूवात झाली आणि ७ फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली. या वीकदरम्यान प्रेमी युगुल आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी चॉकलेट्स, फुले आणि अनेक गिफ्ट्स देतात आणि हा आठवडा साजरा करतात. व्हॅलेंटाईन वीक नुकताच पार पडला. व्हॅलेंटाईन वीकचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील व्हायरल झालेले आपण पाहिले असतील. सध्या एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यात व्हॅलेंटाईन डे दिवशी तरुणाच्या एक्स गर्लफ्रेंडने त्याच्यासाठी चक्क १०० पिझ्झांची ऑर्डर दिली.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

एक्स बॉयफ्रेंडवर काढला राग

एका डिलिव्हरी पार्टनरने एका माणसाच्या दारात १० नाही तर तब्बल १०० पिझ्झा बॉक्स आणून ठेवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच व्हॅलेंटाईन डे पार पडला. या दिवशी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांना खास सरप्राईज देतात. पण हे सरप्राईज गर्लफ्रेंडने दिलं नसून एक्स गर्लफ्रेंडने दिल्याचं बोललं जातंय. एका २४ वर्षीय मुलीने ब्रेकअप झाल्यानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर सूड उगवण्यासाठी त्याच्यासाठी चक्क १०० पिझ्झांची ऑर्डर दिली, अशा दाव्यासह हा व्हिडीओ व्हायरल होतोय. आता यात सूड काय आहे? तर या पिझ्झाची ऑर्डर तिने कॅश ऑन डिलीव्हरी हा ऑप्शन निवडून केली होती. म्हणजेच आता या १०० पिझ्झांचे पैसे त्याला देणं भाग होतं.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की मॅजिकपिन या फूड डिलिव्हरी अ‍ॅपचा एक डिलिव्हरी बॉय ग्राहकाच्या दरवाजात पिझ्झाचे अनेक बॉक्स ठेवताना दिसतोय.

 

Leave a Comment