अतिवृष्टी नुकसान भरपाई 13600 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार यादी जाहीर

जिल्हा निहाय अनुदान

राज्यातील नाशिक विभागाला सर्वाधिक ३६३ कोटी ६६ लाख २३ हजार रुपयांची निधी मिळणार आहे. त्यापाठोपाठ अमरावती विभागाला ३२४ कोटी ४७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर पुणे विभागासाठी १६ कोटी २ लाख ४ हजार, नागपूर विभागासाठी २४ कोटी १४ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर जिल्हानिहाय बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ३०० कोटी ३५ लाख रुपये, नाशिक जिल्ह्यात १९३ कोटी ७ लाख ८ रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी सर्वाधिक १४४ कोटी ८९ लाख ९ हजार रुपये, अकोला जिल्ह्यासाठी २२ कोटी ७३ लाख तर वर्धा जिल्ह्यासाठी ११ कोटी ७६ लाख, पालघर जिल्ह्यासतही १ कोटी ६७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

तसेच धुळे जिल्ह्यासाठी ९ कोटी १९ लाख ३६ हजार रुपये, नागपूरसाठी १० कोटी आण, गडचिरोलीसाठी २ कोटी ३९ लाख ७९ हजार रुपये, यवतमाळसाठी ४८ लाख रुपये, सांगली जिल्ह्यात ८ कोटी ५ लाख रुपये, पुणे जिल्ह्यासाठी २ कोटी ६० लाख रुपये तर ठाणे ३ लाख २ हजार, रायगड ३ लाख २५ हजार रुपये रत्नागिरी १ लाख २१ हजार आणि सिंधुदुर्ग ५ लाख २ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.