Tractor subsidy नमस्कार मित्रांनो भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. शेती क्षेत्रामध्ये आता विविध आधुनिकरण आलेले आहे. पहिले आपण जमीन ही बैलाच्या साह्याने नांगरायचं. शेतकरी सर्व मशागत ही बैलांच्या सहाय्याने करत होते. परंतु आता जसजसा काळ बदलत आहे. त्यानुसार यंत्रे आता जमिनीच्या मशागतीसाठी आलेले आहेत. तर शेतीच्या मशागतीमध्ये सर्वात महत्त्वाचे ठरणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर.
ट्रॅक्टर खरेदीसाठी तुम्हाला मिळणार 50%अनुदान,
आता आपण ट्रॅक्टरच्या मदतीने शेती नांगरू शकतो. शेतीतील अंतर्गत मशातही मशागतही करू शकतो. आणि विविध कामे आता या ट्रॅक्टरच्या सहाय्याने सोपी झालेले आहेत. परंतु मित्रांनो ट्रॅक्टर घेणे हे शेतकऱ्यांना परवडत नाही. बाजार मध्ये असणाऱ्या जास्त किमती यामुळे सध्या अडचण निर्माण होत आहे. याच अडचणीवर उपाय म्हणून केंद्र सरकार राज्य सरकारने ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान देण्याची ठरवलेले आहे.
ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान
देशांमधील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत तुम्हाला 10 टक्के ते 50 टक्क्यांच्या दरम्यान असणार आहे. म्हणजेच एक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 10 ते 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
ट्रॅक्टर खरेदीसाठी तुम्हाला मिळणार 50%अनुदान,
योजनेची उद्दिष्टे
ही योजना चालू करण्यामागे काही सरकारचे उद्दिष्ट आहेत.
- पहिला उद्दिष्ट म्हणजे शेतीची यांत्रिकीकरण होणार आहे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न काढून शेतकऱ्याला फायदा पोहोचवणे आहे.
- यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने श्रमाची बचत होणारे आणि वेळेचे सुद्धा बचत होणार आहे.
- ट्रॅक्टरने जमीन ट्रॅक्टरने जमिनीची मशागत केल्याने उत्पादन खर्च सुद्धा खूप कमी येणार आहे.
- तुम्हाला नफा जास्त वाढणार आहे.
- ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेली शेती नेहमीच आपल्याला उत्पादन क्षमता वाढवून देणारे ठरणार आहे.
- शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुद्धा वाढणार आहे.
- शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारल्यानंतर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुद्धा बळकट होणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि निकष
- पहिले पात्रता म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असणं खूप महत्त्वाचा आहे.
- त्यानंतर तुमच्याकडे शेतीची मालकी पाहिजे. शेतीची मालकी सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे सातबारा आठ अ उतारा अशा गोष्टी असणे आवश्यक आहे.
- तुम्हाला ट्रॅक्टरचे लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पहिले ट्रॅक्टर नसायला पाहिजे. एका शेतकऱ्याला एकच ट्रॅक्टर मिळणार आहे.
- जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर असे शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
- ही योजना लहान मध्यम शेतकऱ्यांसाठीच असल्याने तुमचे जमिनीचे क्षेत्रफळे पाच एकरांच्या आत असणे आवश्यक आहे.
- या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु वार्षिक उत्पन्न तुम्हाला कमी असणे आवश्यक आहे आणि ते प्रत्येक राज्यानुसार वेगळे असेल.
योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- पहिला कागद म्हणजे आधार कार्ड लागेल.
- त्यानंतर पॅन कार्ड लागेल.
- पासबुक लागेल बँक खाते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जेणेकरून अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होईल.
- त्यानंतर शेतीचे कागदपत्र जसे की सातबारा उतारा आठ अशा गोष्टी लागतील.
- वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे.
- त्यानंतर तुमचा रहिवासी प्रमाणपत्र लागेल पासपोर्ट साईज फोटो लागेल.
- मोबाईल नंबर लागेल मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड ची लिंक असलेला हवा
या योजनेसाठी अनुदानाचे रक्कम ही प्रत्येक राज्यांमध्ये वेगवेगळी आहे. काही राज्यांमध्ये 20 ते 50 टक्के अनुदान मिळते. काही राज्यांमध्ये 25 ते 50 टक्के अनुदान मिळते, हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते अनुदानाची रक्कम राज्यानुसार बदलू शकते.
ट्रॅक्टर खरेदीसाठी तुम्हाला मिळणार 50%अनुदान,
महाराष्ट्र राज्यामध्ये महाडीबीटी पोर्टलच्या अंतर्गत तुम्ही मिनी ट्रॅक्टर आणि मोठ्या ट्रॅक्टर साठी अनुदाननासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर जावे लागेल. तिथे आधार नंबर टाकून तुमचे आधी रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागेल. तुम्हाला तिथे सातबाराची डिटेल सुद्धा द्यावी लागेल. त्यानंतर आत मध्ये गेल्यानंतर तुम्हाला यांत्रिकीकरण या बटणावर क्लिक करून ट्रॅक्टर साठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
आपल्या राज्यामध्ये याची लॉटरी दर महिन्याला निघत राहते. लॉटरी निघाल्यानंतर तुमचे नाव आले की नाही तुम्हाला एसएमएस द्वारे कळवले जाईल. लॉटरीमध्ये तुमचे नाव लागल्यास तुम्हाला ट्रॅक्टर साठी अनुदान मिळेल.