अरे, ती तुझ्या लेकीच्या वयाची…’, आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या चिमुकलीची छेड; VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Ice-Cream Seller Teasing a little girl : देशातील महिलांवरील अत्याचार, बलात्कार, शोषण, मारहाण अशा समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दर दिवशी देशाच्या विविध भागांतून अशा घटनांचे व्हिडीओ, फोटो सतत व्हायरल होत असतात, ज्यावर संताप व्यक्त करण्याशिवाय कोणी काहीही करत नाही. अशी पातळी ओलांडणारे लोक समोरची महिलेच्या वयाचेही भान ठेवत नाहीत.

लहानग्या चिमुकलीपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत अशा सर्व वयोगटांतील महिलांची छेड काढण्यास ते मागे-पुढे पाहत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी महिला कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातो.

रस्त्यावरून चालताना अनेकदा महिलांनाच नव्हे, तर लहान लहान मुलींनाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो. आता अशीच एक घटना दाखविणारा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.

लहान लहान मुलींनाही वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो :

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यात काही वासनांध लहान लहान मुलींकडेही वाईट नजरेने पाहतात. त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या लहान मुलीबरोबर असं काही करताना त्यांना लाज कशी वाटत नसेल? आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक वयस्कर व्यक्ती एका चिमुकलीबरोबर, असे काही करताना दिसतोय, जे पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी एका आईस्क्रीमच्या गाडीजवळ आईस्क्रीम घेण्यासाठी आली असून, यावेळी त्या गाडीजवळ उभा असलेला एक जण तिला गाडीतील आईस्क्रीम दाखवण्याच्या बहाण्याने उचलतो आणि तिच्या कपड्यांमध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतो; परंतु त्यामुळे चिमुकली अस्वस्थ होते आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करून खाली उतरते आणि पळून जाते. परंतु, ही सर्व घटना एका व्यक्तीने शूट केली. त्यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आणि बेदम चोपही देण्यात आला.

Leave a Comment