हाताचा, मानेचा लचका तोडला अन्…, भटक्या कुत्र्याने लहान मुलावर केला हल्ला; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

dog attacked on little boy सध्या सर्वत्र भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक लोक जखमी होत आहेत. अनेक ठिकाणी निष्पाप लोकांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही महिन्यांपासून देशात कुत्र्यांची दहशत वाढत आहे.

कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या सतत कुठल्या ना कुठल्या शहरातून येत असतात. भटक्या कुत्र्यांचे हल्ले अनेकदा जीवघेणे ठरले आहेत. अशाच एका कुत्र्याने एका लहान मुलावर जीवघेणा हल्ला करत त्याच्या हाताचा, मानेचा लचका तोडला आहे. याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

कुत्र्याचा लहान मुलावर हल्ला

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, एका रस्त्यावर दोन लहान मुले सायकलवरून फिरत आहेत. तितक्यात अचानक तिथे असलेला एक कुत्रा एका मुलावर हल्ला करतो. या हल्ल्यामुळे तो लहान मुलगा सायकलवरून खाली पडतो, तरीही कुत्रा त्याच्यावर हल्ला करत राहतो. या व्हिडिओची दुसरी बाजू अजूनही स्पष्ट झालेली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांचं असं म्हणणं आहे की, लहान मुलाने कुत्र्याच्या शेपटीवरून सायकल नेल्याने त्याने हल्ला केला असावा. तसेच ही घटना नेमकी कुठे आणि कधी घडली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @primezewsmarathi या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “लहान मुलावर कुत्र्याचा हल्ला! हात, खांदा, मानेचे लचके तोडले” असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, याला तीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

Leave a Comment