दोन टप्प्यांत मिळते अनुदान
या योजनेंतर्गत दिले जाणारे अनुदान एकूण प्रकल्प किमतीच्या ५० टक्क्यांप्रमाणे दोन टप्प्यांत देण्यात येते. अनुदानाचा पहिला टप्पा हा केंद्र शासनाने प्रकल्प मंजूर केल्यानंतर प्रकल्पाचे बांधकाम सुरू करून जिल्हा तपासणी अहवालानंतर देण्यात येतो. दुसरा अंतिम टप्पा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो.
असे मिळते अनुदान
शेळी-मेंढी पालन : १० ते ४० लाख
कुक्कुट पालन : २५ लाख
वराह पालन : १५ ते ३० लाख
पशुखाद्य व वैरण निर्मिती : ५० लाख
या योजनेत अर्ज करण्यासाठी खालील संस्थांना अर्ज करता येतो:
कोणतीही व्यक्ती
शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ)
बचत गट (एसएचजी)
शेतकरी सहकारी संस्था (एफसीओ)
संयुक्त दायित्व गट (जेएलजी)
अधिक माहितीसाठी www.nim.udyamimitra.in किंवा dahd.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान ३ ते ५ एकर शेती असलेल्या युवकांना प्रकल्प किमतीच्या केवळ १० टक्के रक्कम गुंतवून व्यवसाय सुरू करता येतो. तब्बल ५० टक्के अनुदान देण्यात येते. युवकांनी योजनेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुसंवर्धन विभागात संपर्क साधावा.