शेतकऱ्यांना त्यांचे वारसहक्क जलद आणि सुलभपणे मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘जिवंत सातबारा’ ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून राज्यभरात सुरू केली आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यामुळे वारस नोंदणीची प्रक्रिया सुलभ होत आहे.

 

शेतकऱ्यांना करता येणार आता मोफत वारस नोंदणी

येथे जाणून घ्या प्रक्रिया

 

कागदपत्रे:

  • मृत शेतकऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र
  • वारस प्रमाणपत्र किंवा शपथपत्र
  • ग्रामपंचायत/पोलिस पाटील यांचा दाखला
  • सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक)
  • रहिवासी पुरावा (उदा. तलाठी कार्यालयाचा दाखला)

नोंदणी प्रक्रिया:

  • वारसांनी संबंधित तलाठ्याकडे अर्ज आणि कागदपत्रे सादर करावीत.
  • तलाठी कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल तयार करतील.
  • हा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल.
  • ‘ई-फेरफार प्रणाली’द्वारे सातबारा उताऱ्यावर अंतिम नोंद होईल.

संपर्क कुठे करावा?

  • शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया सुरू करावी.