Ladki Bahin Scheme Maharashtra : नमस्कार मित्रांनो, ‘माझी लाडकी बहीण’ योजनेत महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न अनेकजणी विचारत आहेत. या योजनेत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹ १५०० जमा केले जातात. आता एप्रिल महिना संपायला केवळ काही दिवस शिल्लक आहेत, तरीही एप्रिलच्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही.
या महिलांना मिळणार नाहीत पैसे हे पाहण्यासाठी
परंतु, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत्या ७२ तासांत महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले होते की, एप्रिल महिन्याच्या अखेरीसपर्यंत हा हप्ता निश्चितपणे जमा केला जाईल. आता एप्रिल महिना संपायला फक्त ३ दिवस उरले असल्याने, पुढील ७२ तासांत कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात, ज्यामुळे महिलांमध्ये आनंदाची लहर आहे.
या महिलांना मिळणार नाहीत पैसे हे पाहण्यासाठी
लाडकी बहीण योजनेत ज्या महिला इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. मात्र, ज्या योजनांमध्ये महिलांना ₹ १५०० पेक्षा कमी रक्कम मिळते, त्या योजनांमधील उर्वरित रक्कम लाडकी बहीण योजनेद्वारे दिली जाईल. उदाहरणार्थ, नमो शेतकरी योजनेत महिलांना ₹ १००० चा लाभ मिळतो, त्यामुळे उर्वरित ₹ ५०० रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना दिले जातील.