तरुणानं एका क्षणात पळवलं अडीच तोळ्याचं मंगळसूत्र, महिलांनो VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा

Two youths steal gold ornaments : सध्या लूटमार आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरांनी चोरी करण्यासाठी नवीन युक्त्या शोधल्या आहेत. कितीही हुशार चोर असले तरी, शेवटी पोलीस त्यांना पकडतातच. तरीही चोऱ्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. चोरांचे वैशिष्ट्य म्हणजे चोरी करताना त्यांना कोणाचीही दयामाया नसते. संधी मिळाली की, ते लहान-मोठी चोरी करतातच.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

आजकाल सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिलांसाठी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे त्यावर वाईट नजर टाकल्यास महिला संतप्त होतात. यापूर्वी रस्त्यावरुन जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये महिलांना गंभीर दुखापत झाली आहे, तर काहींनी जीवही गमावला आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

एका क्षणात पळवलं मंगळसूत्र :

गेल्या काही महिन्यांपासून सोनसाखळी चोरांचा त्रास वाढला आहे. गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक कार्यक्रमात आणि भरदिवसा रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्याच्या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. सोशल मीडियावर साखळीचोरांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सध्या समोर आलेला व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेजमधील आहे. यात एक चोर महिलेच्या अगदी जवळ जातो आणि अत्यंत चपळाईने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून तेथून पळून जातो. व्हिडिओमध्ये दोन तरुण दुचाकीवर बसलेले दिसत आहेत. सुरुवातीला ते रस्त्याच्या कडेला कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसते. मात्र, त्यांची ती एक चाल असते. समोरून येणाऱ्या महिलांवर ते बराच वेळ लक्ष ठेवतात. जशा महिला त्यांच्याजवळ येतात, तसा दुचाकीवर मागे बसलेला तरुण महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचतो आणि वेगाने दुचाकी चालवत तेथून निघून जातात.

Leave a Comment