या योजनेत २० टक्के अनुदान दिले जाते, ज्यामुळे गरजू गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करणे अधिक सोपे होते. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेअंतर्गत दरवर्षी अनेक बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचे वितरण केले जाते. मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटांना तब्बल ७२ मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान वाटप करण्यात आले. प्रत्येक स्वयंसहाय्यता बचत गटाला ट्रॅक्टर खरेदीसाठी ₹ ३ लाख १५ हजार पर्यंतचे अनुदान मिळू शकते.
मिनी ट्रॅक्टर साठी सव्वा तीन लाख रुपये अनुदान
आवश्यक कागदपत्रे
- बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र.
- राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते असलेल्या पासबुकची छायांकित प्रत.
- बँकेने प्रमाणित केलेली सदस्यांची फोटोसह यादी.
- बचत गटातील अध्यक्ष, सचिवांसह किमान ८० टक्के सदस्यांचे जातीचे दाखले.
- सदस्यांचे रहिवासी दाखले/स्वयंघोषणापत्र.
- सदस्यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड.
- बचत गट स्थापनेचा ठराव.
- मिनी ट्रॅक्टर मिळविण्यासाठी सर्व सदस्यांचा सामूहिक ठराव.
- सदस्यांच्या बैठकीचा एकत्रित छायाचित्र.