या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा
पीक विमा वितरणातील सद्यस्थिती
मागील वर्षी सांगोला तालुक्यात खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला होता. अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीत पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीच्या नियमानुसार, ७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती दिली होती. त्यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानीची पडताळणी केली.
सांगोला तालुक्यातील सुमारे ८६,६६३ शेतकऱ्यांनी एक रुपया भरून पीक विमा उतरवला होता आणि ५५,१२८ हेक्टर क्षेत्राचा यामध्ये समावेश होता. मागील आठ दिवसांपासून ३,२१४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ५ कोटी ४७ लाख ७३ हजार रुपये जमा झाले आहेत, ही एक सकारात्मक बाब आहे. परंतु, उर्वरित मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा अनुदानापासून का वंचित ठेवले गेले, याची चौकशी सुरू आहे.