MPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती,लगेच अर्ज करा

MPSC Vacancies :महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध (Notification released) करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी २१ जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १० फेब्रुवारी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाचे अधिकृत https://shorturl.at/xUqqj वर जाऊन उमेदवार अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
01 ते 010/2025 1 विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ 95
011/2025 2 जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ 225
Total 320

 

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग एकूण जागा किती:

या भरती मोहिमेत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट अ संवर्गांतील २२५ पदे भरण्यात येणार आहेत. तर त्याच विभागातील विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ संवर्गांतील एकूण ९५ पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वयोमर्यादा:

भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांचे किमान वय हे १९ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे पर्यंत असणे आवश्यक आहे.

तसेच खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांना ७१९ रुपये तर मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अनाथ/अपंग प्रवर्गातील उमेदवारांना ४४९ रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे.

Leave a Comment