PM Kisan पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये 6 हजार रुपये दिले जातात. देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दिली गेली आहे. केंद्र सरकारनं या योजनेची सुरुवात 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना आतापर्यंत पीएम किसानचे 18 हप्ते मिळाले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना 36 हजार रुपयांची रक्कम मिळाली आहे. आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे.
पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव
18 हप्त्यांचे 36000 रुपये मिळाले, 19 वा हप्ता कधी ?
पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु झाल्यापासून ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली असेल त्यांना आतापर्यंत एकूण 18 हप्त्यांची रक्कम मिळाली आहे. म्हणजेच त्यांना एकूण 36000 रुपये मिळाले आहेत. आता 19 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनवेर 3.46 ला कोटी रुपयांची रक्कम खर्च करण्यात आली आहे. देशातील 18 व्या हप्त्यांपर्यंत या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 11 कोटींपर्यंत होती. 18 व्या हप्त्याची रक्कम जवळपास 9 कोटी 58 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आली आहे.