किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत मिळणार ५ लाख रुपये जाणून घ्या संपूर्ण माहिती

केव्हा सुरू झाली किसान क्रेडिट कार्ड योजना?

किसान क्रेडिट कार्ड योजना जवळपास 26 वर्षांपूर्वी सुरू झाली. ही योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेत शेतकऱ्यांना शेतीसंबंधीत कामासाठी 9 टक्के व्याजाने अल्प कालावधीचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सरकार कर्जावरील व्याजात 2 सवलत पण देते. तर जे शेतकरी वेळेत कर्जाची परतफेड करतात, त्यांना प्रोत्साहन म्हणून 3 टक्के सवलत देण्यात येते. म्हणजे मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे कर्ज वार्षिक केवळ 4 टक्के व्याज दराने देण्यात येते. 30 जून 2023 पर्यंत असे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 7.4 कोटींहून अधिक होती. त्यांच्यावर 8.9 लाख कोटी रुपयांहून अधिकचे कर्ज होते.

 

इथे क्लिक करून जाणून घ्या

 

किती क्रेडिट कार्डचे वाटप

किसान क्रेडिट कार्ड मोहिमेत बँका आणि ग्रामीण वित्तीय संस्थांचा समावेश आहे. NABARD च्या डाटानुसार, ऑक्टोबर 2024 पर्यंत सहकारी बँका आणि विभागीय ग्रामीण बँकांनी देशभरात 167.53 लाख किसान क्रेडिट कार्ड दिले. त्यांची एकूण क्रेडिट मर्यादा 1.73 लाख कोटी रुपये होती. दूध डेअरीसंबंधीत शेतकर्‍यांना 11.24 लाख कार्ड वाटप करण्यात आले आहे.