ladaki bahin
aditi tatkare update संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना या दोन्ही योजनांद्वारे निराधार महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, शासनाच्या नियमानुसार एका योजनेचा लाभ घेत असताना दुसऱ्या योजनेचा लाभ घेता येत नाही. तरीही काही महिलांनी एकापेक्षा अधिक योजना घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात सखोल पडताळणी केली जाणार आहे. अशा लाभार्थींनी स्वतः निवड करून एकाच योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.