बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती
Bank Of Baroda Specialist Officer Recruitment 2025 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी नामी संधी चालून आली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती करण्यात येईल. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा. इच्छुक आणि पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. बँक ऑफ बडोदानं या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १२६७ व्यवस्थापक आणि इतर पदे भरली जातील. अर्जाची प्रक्रिया आता सुरु झाली असून उमेदवार त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. 27 जानेवारीपर्यंत इच्छूक या भरतीसाठी अर्ज करु शकतात.