अशी वेळ कोणावरच येऊ नये! टेम्पो अन् ट्रकच्यामध्ये अडकला अन्…, बाइकस्वाराचा ‘हा’ VIDEO पाहून बसेल धक्का
अति घाई संकटात नेई’ हे वाक्य आपण अनेकदा वाचलं ऐकलं असेल. म्हणून उशीर होत असला तरी घाई न करता सुरक्षित प्रवास करावा, असं सांगितलं जातं. तरीही लोक आपलंच खरं करतात आणि अडचणीत सापडतात.
सोशल मीडियावर अनेकदा रस्ते अपघातांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असे भयंकर अपघात पाहून अक्षरश: अंगावर काटा येतो.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
स्त्यावर वाऱ्याच्या वेगाने गाडी चालवताना काही जणांना आजूबाजूच्या गोष्टींचं भानच नसतं आणि हेच कारण अनेक अपघातांना पुरेसं ठरतं. सध्या सोशल मीडियावर एका अशाच अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्याच एका बाइकचा अपघात झाला आहे. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…
अपघाताचा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका टेम्पोच्या मागून एक बाइकचालक आपली बाइक योग्य रितीने चालवत असतो. तेवढ्यात टेम्पोचालक अचानक ब्रेक मारतो. यामुळे बाइकस्वारही आपली गाडी नियंत्रणात आणून ब्रेक मारतो. या बाइकवर बाइकचालकासह मागे अजून एक व्यक्ती बसलेली असते. तेवढ्यात मागून अगदी भरधाव वेगात ट्रक येतो आणि त्या बाइकला धडक देतोय बाइकला धडक देताच पुढच्या टेम्पोच्या आणि मागच्या ट्रकच्या मधोमध दोघे चिरडले जातात. पण तेवढ्यात ट्रकचालकदेखील ब्रेक मारतो. पण या अपघातात दोघांनाही दुखापत झाल्याचं दिसून येतंय.