आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर झाले. त्याला चार महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधून फारच कमी प्रस्ताव सादर झाले आहेत. या योजनेची जनजागृतीच न झाल्याने व राष्ट्रीयकृत बँकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचली नसल्याची बाब समोर आली आहे.
त्यामुळे या योजनेचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन पर्यटन विभागाचे उपसंचालक शमा पवार यांनी केले आहे. राज्य शासनाच्या पर्यटन विकास विभागाच्या वतीने पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी या योजनेची निर्मिती केली आहे. पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे व्यवसायासाठी नोंदणीकृत असला पाहिजे. हा व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा.