Central Bank of India Recruitment : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 266 पदांसाठी भरती,असा करा ऑनलाईन अर्ज

Central Bank of India Recruitment 2025 : तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं असेल तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ही संधी हुकवू नका. या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला अधिकारी होण्याची चांगली संधी मिळत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 266 पदे भरण्यात येणार आहेत. सेंट्रल बँकेने ज्युनिअर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-1 (झोन बेस्ड ऑफिसर) पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. याविषयी पुढे विस्ताराने वाचा.

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ऑनलाईन अप्लाय

करण्यासाठी येथे क्लिक करा

 

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरती मोहिमेच्या माध्यमातून एकूण 266 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 21 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2025 आहे. याविषयी पुढे विस्ताराने वाचा.

शैक्षणिक पात्रतेचे निकष काय?

शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी घेतलेली असावी. याशिवाय मेडिकल, चार्टर्ड अकाऊंटन्सी (CA) आणि इंजिनीअरिंग सारखी विशेष पात्रता असलेले उमेदवारही भरतीसाठी अर्ज करू शकतात.

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ऑनलाईन अप्लाय

करण्यासाठी येथे क्लिक करा

 

वयोमर्यादा नेमकी किती?

उमेदवाराचे वय 21 वर्षापेक्षा कमी आणि 32 वर्षापेक्षा जास्त नसावे. वयाची गणना 30 नोव्हेंबर 2024 च्या आधारे केली जाईल.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळ centralbankofindia.co.in. या वर जावे.
  • त्यानंतर होमपेजवरील भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘अप्लाई ऑनलाइन’ बटणावर क्लिक करा आणि अर्ज भरा.
  • आता कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरा.
  • त्यानंतर तुमच्या अर्जाची प्रिंटआऊट घ्या.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ऑनलाईन अप्लाय

करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज शुल्क किती असेल?

अर्ज भरण्यासोबतच, इतर सर्व श्रेणीतील उमेदवारांना ८५० रुपये + जीएसटी जमा करावे लागेल. एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी आणि महिला उमेदवारांना शुल्क म्हणून १७५ रुपये + जीएसटी भरावे लागतील. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येते.

भरती तपशील

या भरतीद्वारे एकूण २६६ पदांची भरती केली जाईल. यापैकी १२३ पदे अहमदाबाद झोनसाठी, ५८ पदे चेन्नई झोनसाठी, ४३ पदे गुवाहाटी झोनसाठी आणि ४२ पदे हैदराबाद झोनसाठी राखीव आहेत.

Leave a Comment