Viral video: सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण
रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी,
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील
कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, अशाच काही गृहिणींच्या डान्स व्हिडीओची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात काही आनंदाचे, मौजमजेचे क्षण घालवण्याची इच्छा प्रत्येकाची असते, मग ती स्त्री असो वा पुरुष.
पुरुषांसाठी कधीकधी स्वतःसाठी वेळ शोधणं सोपं असतं, ते त्यांच्या मित्रांसह कुठेतरी बाहेर जाऊ शकतात.
अनेकवेळा ऑफिसच्या कामामुळे दौऱ्यावर जाण्याची शक्यता असते. घरीही, कामावरून आल्यानंतर त्यांना एकटाच नो-डिस्टर्बन्स
झोन मिळतो. पण महिलांच्या बाबतीत अशाप्रकारे स्वत:साठी वेळ काढणं फार कठीण असतं.