धान उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रति हेक्टरी २०,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान!
Dhan Bonus Deposited : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत (MSP) खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या हमीभावा व्यतिरिक्त, आता नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता त्यांच्या धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रती हेक्टरी २०,००० रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) प्रोत्साहनपर धान अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने (DBT) अदा करण्यात येणार असून, याबाबतचा शासन निर्णय अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने आज, १८ जून २०२५ रोजी निर्गमित केला आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ₹ 20000 येन्यास सुरुवात
तुम्हाला आले का चेक करा
कोणाला मिळणार हे अनुदान?
या शासन निर्णयानुसार, हे अतिरिक्त प्रोत्साहनपर धान अनुदान फक्त पणन हंगाम सन २०२३-२४ मधील खरीप धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लागू राहील. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खरीप पणन हंगाम २०२३-२४ साठी धान, भरडधान्य खरेदीबाबतच्या शासन निर्णयानुसार सर्व अटी व शर्तींनुसार नोंदणी केली असल्याची दक्षता घ्यावी.
अनुदानाची कार्यपद्धती
हे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे असणार आहे:
- ई-पीक पाहणीद्वारे खातरजमा: किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी ज्यांनी प्रत्यक्ष पेरणी केली आहे, त्यांच्या क्षेत्राची ई-पीक पाहणी ॲपद्वारे खातरजमा केली जाईल.
- सातबारा उतारानुसार लाभ: जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील धान लागवडीच्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभाची रक्कम अनुज्ञेय राहील.
- थेट बँक खात्यात जमा: शेतकऱ्यांना (त्यांनी धान विक्री केले असो वा नसो) धान उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी २०,००० रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर धान अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ₹ 20000 येन्यास सुरुवात
तुम्हाला आले का चेक करा
विक्रीची अट नाही!
या योजनेतील एक महत्त्वाचा आणि दिलासादायक मुद्दा म्हणजे, प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे धान अभिकर्ता संस्थांना (मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ) विक्री करणे बंधनकारक नाही. धान उत्पादक शेतकरी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन अभिकर्ता संस्थांकडून सुरू केलेल्या कोणत्याही खरेदी केंद्रावर नोंदणीकृत असावा.
या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी ₹ 20000 येन्यास सुरुवात
तुम्हाला आले का चेक करा
महत्त्वाची नोंद: जर एखादा शेतकरी दोन्ही अभिकर्ता संस्थांकडे नोंदणीकृत असल्यास, त्याच्या एकूण जमीन धारणेनुसार (दोन हेक्टरच्या मर्यादेत) त्याला प्रोत्साहनपर धान अनुदान देय राहील.
या निर्णयामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल आणि त्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळेल अशी अपेक्षा आहे.
तुम्ही धान उत्पादक शेतकरी आहात का? तुम्हाला या योजनेचा फायदा होईल असे वाटते का?