धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २०,००० रुपये

अनुदानाची कार्यपद्धती
  • ई-पीक पाहणीद्वारे खातरजमा: किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी ज्यांनी प्रत्यक्ष पेरणी केली आहे, त्यांच्या क्षेत्राची ई-पीक पाहणी ॲपद्वारे खातरजमा केली जाईल.
  • सातबारा उतारानुसार लाभ: जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील धान लागवडीच्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणात संबंधित शेतकऱ्याला लाभाची रक्कम अनुज्ञेय राहील.
  • थेट बँक खात्यात जमा: शेतकऱ्यांना (त्यांनी धान विक्री केले असो वा नसो) धान उत्पादनाकरिता प्रती हेक्टरी २०,००० रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर धान अनुदान थेट लाभ हस्तांतरण (DBT) माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे.