Electricity Regulatory Commission : नमस्कार मित्रांनो, घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या १ एप्रिलपासून वीजदर कमी होणार आहेत. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, टाटा, अदानी आणि बेस्टसह इतर वीज वितरण कंपन्यांना नवीन वीजदर लागू करण्यास मंजुरी दिली आहे.

1 एप्रिल पासून घरगुती वीज दर होणार कमी

लागणार इतके रुपये युनिट

वीजदरात कपात:

  • व्यवसायिक स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ आणि रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत १० ते ३० टक्के वीजदर कमी होणार आहेत.
  • महावितरण कंपनीचे वीजदर १० टक्क्यांनी कमी होणार आहेत.
  • अदानी कंपनीचे वीजदरही १० टक्के कमी होणार आहेत.
  • टाटा कंपनीचे १८ टक्के वीजदर कमी होणार आहेत.
  • बेस्ट वीज कंपनीचे वीजदर ९.२८ टक्के कमी होणार आहेत.

वीजदर कमी होण्याची कारणे:

  • अपारंपरिक ऊर्जा आणि सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.
  • सध्या सौरऊर्जेचे दर प्रति युनिट तीन साडेतीन रुपये आहेत.
  • अपारंपरिक ऊर्जाचा दर प्रति युनिट ८ ते ९ रुपये आहे.
  • महावितरणचे दर सध्या प्रति युनिट ४ ते ४.५० रुपये आहेत, जे १ एप्रिलपासून आणखी कमी होणार आहेत.