शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी.! फार्मर आयडी कार्ड नसेल तर मिळणार नाही आता पिक विमा योजनेचा लाभ

मृग बहारातील फळपीक विमा योजनेसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य!

Fruit Crop Insurance Scheme : नमस्कार मित्रांनो, यंदाच्या मृग बहारातील फळपीक विमा योजनेचे अर्ज भरणे सुरू झाले आहे. वेगवेगळ्या फळपिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वेगवेगळी असली तरी, यंदा फळपीक विम्यासाठी अर्ज करायचा असेल तर कृषी विभागाने एक महत्त्वाची अट घातली आहे.

फार्मर आयडी कार्ड नसेल तर

मिळणार नाही पिक विमा

राज्यात भारतीय कृषि विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.

‘फार्मर आयडी’ (शेतकरी ओळखपत्र क्रमांक) बंधनकारक

राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार, कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी आता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) अनिवार्य करण्यात आला आहे. यामुळे, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग आणि आंबिया बहारसाठी ॲग्रिस्टॅक (AgriStack) अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल, अशा शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेत सहभाग घेता येणार नाही.

फार्मर आयडी कार्ड नसेल तर

मिळणार नाही पिक विमा

फार्मर आयडी कसा मिळवाल?

गावपातळीवर शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी करता येत असून, तिथे फार्मर आयडी देण्यात येतो. कृषी विभागाच्या माहितीनुसार, ॲग्रिस्टॅक अंतर्गत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एक कोटींच्या वर गेली असली तरी, अजूनही बहुतेक शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणे गरजेचे आहे.

केवळ फळपीक विमाच नाही, तर इतर योजनांसाठीही महत्त्वाचा

फळपीक विमा योजनेबरोबरच खरिपातील पिकांच्या विमा अर्जासाठीसुद्धा फार्मर आयडी आवश्यक असणार आहे. यापुढे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल, अशा शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. कृषी विभागाकडून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही आणि कृषी विभागाकडील शेतकऱ्यांची अद्ययावित माहिती उपलब्ध होईल.

Leave a Comment