घरात रोज अगरबत्ती लावत असाल तर, सावधान! पुण्यात घराला लागली आग, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं…
House caught fire in Pune : सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाईट वेळ कधी सांगून येत नाही, म्हणून नेहमी जबाबदारीने वागणं गरजेचं असतं. कोणती चूक कधी अंगाशी येईल आणि दुर्घटना घडेल हे काही सांगता येत नाही. आणि अशा दुर्घटनेत नशिबाने कोण वाचलं तर ठिक नाहीतर अनेकदा दुखापत होते किंवा काहींच्या जीवावरही बेततं. अशा घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
सध्या अशीच घटना पुण्यात घडली आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, या व्हिडीओमध्ये पुण्यातील एका घराला या गोष्टीमुळे आग लागली आहे. नेमकी कोणती गोष्ट आहे ती, आणि नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊ या…
पुण्यातील घराला लागली आग
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एका घरात आग लागल्याचं दिसून येतंय. ही आग खिडकीतून दिसत आहे. तसंच काही लोक खिडकीबाहेर उभं राहून या धक्कादायक घटनेवर उपाय शोधण्यासाठी जमलेत असं दिसून येतंय. व्हायरल व्हिडीओच्या कॅप्शनवरून असं दिसून येतंय की, हा प्रकार पुण्यातील फातिमानगरमध्ये घडला असून अगरबत्तीमुळे आगीने पेट घेतला आहे.