HSC Result Will be Declare Today : नमस्कार मित्रांनो, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) नुकतीच इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.
आज दुपारी होणार 12वी चा निकाल होणार जाहीर
सोमवारी, ५ मे २०२५ रोजी दुपारी ठीक १ वाजता बारावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे, अशी अधिकृत माहिती मंडळाने दिली आहे. HSC Result
यावर्षी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्डाच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यापूर्वी, २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे ८.१ लाख विद्यार्थी, ६.९ लाख विद्यार्थिनी आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
आज दुपारी होणार 12वी चा निकाल होणार जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा यशस्वीरित्या पार पडली. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना उद्या दुपारी १ वाजता खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाइन पाहता येणार आहे:
- mahresult.nic.in
- hscresult.mahresults.org.in
- hscresult.mkcl.org
- hscresult.mahahsscboard.in
निकाल जाहीर होण्यापूर्वी, बोर्डाची एक पत्रकार परिषद आयोजित केली जाईल, ज्यामध्ये निकालासंबंधी विस्तृत माहिती दिली जाईल. त्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या नोंदणी क्रमांकाचा (Registration Number) किंवा रोल नंबरचा (Roll Number) आणि आवश्यक पासवर्डचा वापर करून अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहू शकतील. HSC Result
आज दुपारी होणार 12वी चा निकाल होणार जाहीर
त्यामुळे, बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी उद्या दुपारी १ वाजेनंतर मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांना भेट देऊन आपला निकाल पाहावा. तुमच्या मेहनतीचे फळ आता तुमच्या समोर असेल! HSC Result