आयडीबीआय बँकेत स्पेशलिस्ट केडर ऑफिसर (SCO) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत डेप्युटी जनरल मॅनेजर (डीजीएम), असिस्टंट जनरल मॅनेजर (एजीएम) आणि मॅनेजर यांसारख्या विविध पदांवर भरती केली जाणार आहे.
महत्त्वाच्या तारखा:
- नोंदणी सुरू होण्याची तारीख: ७ एप्रिल २०२५
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० एप्रिल २०२५
पदांची संख्या आणि श्रेणी:
- उपमहाव्यवस्थापक (डेप्युटी जनरल मॅनेजर) – ग्रेड डी: ८ पदे
- सहाय्यक महाव्यवस्थापक (असिस्टंट जनरल मॅनेजर) – ग्रेड सी: ४२ पदे
- व्यवस्थापक (मॅनेजर) – ग्रेड बी: ६९ पदे
अर्ज शुल्क:
- सामान्य/आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (ईडब्ल्यूएस)/इतर मागासवर्गीय (ओबीसी): जीएसटीसह ₹ १०५०
- अनुसूचित जाती (एससी)/अनुसूचित जमाती (एसटी): जीएसटीसह ₹ २५०
निवड प्रक्रिया:
- प्राथमिक तपासणी
- गट चर्चा आणि/किंवा वैयक्तिक मुलाखत
- मूळ कागदपत्रांची पडताळणी
अर्ज कसा करावा?
- इच्छुक उमेदवारांना आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.