माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा?
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपं आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यानंतर फॉर्म डाउनलोड करावा लागेल. तो काळजीपूर्वक वाचून भरावा लागेल. जर काही चूक झाली तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो. फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागतील.
एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा
माझी कन्या भाग्यश्री योजनेतील नियम आणि अटी
मुलीचे आईवडिल महाराष्ट्रातील असावेत
- योजना सर्व गटातील दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र रेषेवरील एपीएल पांढरे रेशन कार्डधारक दोन मुलींना लागू असेल.
- विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण आवश्यक आहे. तसेच दहावी उत्तीर्ण होणे व 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित आवश्यक
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना मुलगी जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जर जुळ्या मुली झाल्या, तर या दोन्ही मुली प्रकार दोनचे लाभार्थी प्रमाणे योजनेस पात्र असतील.
- बालगृहातील अनाथ मुलींसाठी योजना लागू आहे
- एखाद्या परिवाराने अनाथ मुली दत्तक घेतले असेल, तर सदर मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ घेता येईल