Devendra Fadnavis on Farmer Loan Waiver | कर्जमाफीची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं?

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे. मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला आहे.( Budget 2026 for Maharashtra ) त्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली होती. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. २ लाखांपर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे. ( Farmer Loan Waiver Maharashtra )