reject list
योजनेच्या संदर्भात पडताळणी होऊ शकते, याचा अंदाज प्रशासनाला होता. त्यामुळे प्रशासनाकडून अगोदरच तयारी करण्यात आली होती, तर अंगणवाडी सेविकांनीच बहुतांश अर्ज ऑनलाइन भरले असल्याने त्यांना परिसरातील महिलांची माहिती आहे. अंगणवाडी सेविकांची अगोदरच तशी तयारी झालेली आहे. त्यामुळे पडताळणीचे काम कमी कालावधीत होऊन शासनाला अपात्र लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून पाठविणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी सोमवारी (ता. ३) दुरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना ‘लाडक्या बहिणीच्या’ घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर पडताळणीसाठीच्या प्रक्रियेला वेग आला. स्वताहून महिलांनी लाभसोडावा, असे आवाहन शासनाने केले होते, त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पडताळणी करण्याचे कडक पाऊल उचलले आहे.