लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे जाहीर, यादीत नाव पहा

ladaki bhain rejection list मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभाथ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे चारचाकीवाल्या ‘बहिणीं’ची यादी आली आहे. शासनाकडून आलेल्या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील ७५ हजार १०० लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाले आहे. या यादीनुसार आता अंगणवाडी सेविका ‘बहिणीं च्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत.

 

लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

राज्य शासनाकडून प्रत्येक परिवहन विभागाकडून यादी घेऊन ती जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली. या याद्यांनुसार प्रत्येक जिल्ह्यात बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन पडताळणी करणार आहेत. पुणे जिल्ह्यासाठीच्या दोन याद्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आल्या आहेत. त्यातील पहिल्या यादीत ५८ हजार ३५०, तर दुसऱ्या यादीत १६ हजार ७५० अशी एकूण ७५ हजार १०० वाहनधारकांची यादी प्रशासनाला मिळाली आहे. या यादीतील नावे तालुकानिहाय संबंधित अधिकाऱ्यांना देऊन प्रत्यक्षात पडताळणीचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणाऱ्या महिलांची नावे

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी सोमवारी (ता. ३) दुरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना ‘लाडक्या बहिणीच्या’ घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर पडताळणीसाठीच्या प्रक्रियेला वेग आला. स्वताहून महिलांनी लाभसोडावा, असे आवाहन शासनाने केले होते, त्याला अगदी कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पडताळणी करण्याचे कडक पाऊल उचलले आहे.

Leave a Comment