online apply
ladki bahin yojana online apply संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ मिळणाऱ्या अनेक महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर केला होता. अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासही सुरुवात झाली. मात्र, ज्या महिलांना निराधार योजनेतून अनुदान मिळत असेल, अशा महिलांना केवळ एकाच योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे.
कागदपत्रे जमा न केल्यास अनुदान होणार बंद.
ज्या निराधार महिलांनी महसूल विभागाकडे कागदपत्रे जमा केली नाहीत तर त्यांना पुढे मिळणारे अनुदान बंद होणार आहे. विशेष म्हणजे, यातून छाननी केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी बोगस लाभार्थी आहेत किंवा दोन्ही योजनांच लाभ घेत आहेत. त्यांना आता अडचणी भेळसाडणार असून त्यांचे अनुदान बंद होणार आहे.