लाडकी बहीण योजना: अपात्र महिलांना लाभ नाही!
माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी झालेल्या महिलांच्या अर्जांची सध्या कसून पडताळणी सुरू आहे. या तपासणीमध्ये ज्या महिला योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत. अशा अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेअंतर्गत एक रुपयाचाही लाभ मिळणार नाही.
सध्या, लाडकी बहीण योजनेत विशेषतः महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. यापूर्वी इतर आवश्यक निकषांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे, ज्या महिला शासनाच्या नियमांनुसार पात्र ठरत नाहीत, त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत हे निश्चित आहे. यापूर्वीच काही महिलांना योजनेचा लाभ मिळणे थांबले आहे आणि आता पडताळणीच्या अंतिम टप्प्यात आणखी काही महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे, ज्यांना यापुढे कोणताही हप्ता मिळणार नाही.