Ladki Bahin Yojana January Installment Date : राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही.
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
Ladki Bahin Yojana Next Installment Date : विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना १५०० रुपये देण्यात येतात. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० रुपयांवरून पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास २१०० रुपये वाढीव निधी देऊ अशी घोषणा केली होती. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहिणींना २१०० रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे २१०० रुपये लाडक्या बहिणींना मिळणार की नाही? तसेच मिळणार असतील तर कधी? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. यावरून विरोधकांनीही अनेकदा सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान, आता यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी
लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही?
- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार की नाही? याबाबत भाष्य केलं आहे.
- आदिती तटकरे यांनी म्हटलं की, “आम्ही याबाबत आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे.
- तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे.
- आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल.
- मात्र, तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना १५०० रुपयांचाच लाभ आपण देणार आहोत”, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी