लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत..यादीतआपले नाव पहा.

ladki Bahin Yojana online apply : लाडकी बहिण योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी सध्या महाराष्ट्रात महिलांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे महिला अर्जदारांची ही संख्या आणखी वाढणार आहे. मात्र असे असले तरी अर्ज केलेल्या सर्वच महिलांना याचा लाभ मिळणार नाही. यामुळे प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या दीड कोटींच्या घरात राहील असा एक अंदाज आहे.

या महिलांना अर्ज केला तरी लाभ मिळणार नाही ?

  • कौटुंबिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र राहणार आहेत.
  • अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
  • सरकारने सांगितल्याप्रमाणे ज्या महिलांना शासकीय योजनांच्या माध्यमातून आधीच पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा लाभ मिळत असेल तर त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
  • पण अन्य शासकीय योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेसाठी अशा महिला पात्र ठरणार आहेत.
  • अर्थातच संजय गांधी निराधार योजनेसाठी पात्र महिला यासाठी अपात्र राहणार आहेत.
  • 21 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील.
  • पण जर संबंधित महिलेने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत लग्न केले असेल तर त्यांना याचा लाभ मिळू शकणार आहे.
  • ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असेल तर अशा कुटुंबातील महिला यासाठी पात्र ठरणार आहेत.
  • सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना तसेच कुटुंबात कोणी शासकीय सेवेत कार्यरत असेल तर अशा कुटुंबातील महिलेला याचा लाभ मिळणार नाही.
  • कुटुंबात जर एखाद्या सदस्याला निवृत्तीवेतनाचा म्हणजेच पेन्शनचा लाभ मिळत असेल तर अशा महिला देखील या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत.
  • आयकर भरणाऱ्या कुटुंबातील महिला देखील लाडक्या बहिणीसाठी अपात्र ठरणार आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहेत अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / संचालक / सदस्य आहेत अशा महिला देखील यासाठी अपात्र ठरणार आहेत.