शेतकऱ्यांना त्यांचे वारसहक्क जलद आणि सुलभपणे मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘जिवंत सातबारा’ ही मोहीम 1 एप्रिल 2025 पासून राज्यभरात सुरू केली आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, यामुळे वारस नोंदणीची प्रक्रिया सुलभ होत आहे.
शेतकऱ्यांना करता येणार आता मोफत वारस नोंदणी
कागदपत्रे:
- मृत शेतकऱ्याचे मृत्यू प्रमाणपत्र
- वारस प्रमाणपत्र किंवा शपथपत्र
- ग्रामपंचायत/पोलिस पाटील यांचा दाखला
- सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, संपर्क क्रमांक)
- रहिवासी पुरावा (उदा. तलाठी कार्यालयाचा दाखला)
नोंदणी प्रक्रिया:
- वारसांनी संबंधित तलाठ्याकडे अर्ज आणि कागदपत्रे सादर करावीत.
- तलाठी कागदपत्रांची पडताळणी करून अहवाल तयार करतील.
- हा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल.
- ‘ई-फेरफार प्रणाली’द्वारे सातबारा उताऱ्यावर अंतिम नोंद होईल.
संपर्क कुठे करावा?
- शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी प्रक्रिया सुरू करावी.