शेतजमिनीच्या हद्दीवरून होणारे वाद आपल्यासाठी काही नवीन नाहीत. विशेषतः बांधावरून शेजाऱ्यांशी खटके उडणे हे अनेक ठिकाणी नित्याचे झाले आहे. मात्र, आता या वादांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. भूमी अभिलेख विभागाने नुकत्याच जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांमुळे जमीन मोजणीची प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होणार आहे.