नवीन जमीन खरेदी विक्री करत असाल तर शासनाचा हा नवीन नियम जाणून घ्या

Land Record Maharashtra : मित्रांनो, जर तुम्ही आता जमिनीचा कोणताही पोटहिस्सा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. यापुढे पोटहिस्स्याचा अधिकृत नकाशा असल्याशिवाय तुमचा खरेदीदस्त नोंदवला जाणार नाही! राज्य शासनाने मुद्रांक विभागाला याबाबत स्पष्ट आदेश जारी केले आहेत. यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आवश्यक नकाशे उपलब्ध नसल्याने खरेदी दस्तांची कामे सध्या थांबली आहेत.

नवीन जमीन खरेदी विक्री करत असाल तर शासनाचा

हा नवीन नियम जाणून घ्या

राज्य शासनाने २८ एप्रिल २०२५ रोजी याबाबतचे राजपत्र (गॅझेट) प्रसिद्ध केले आहे. यानुसार, आता मालमत्तेची ओळख पटवण्यासाठी केवळ पुरेसे वर्णन पुरेसे नसून, खरेदी दस्तात पोटहिश्श्याच्या नकाशाची सक्ती करण्यात आली आहे. राज्यामध्ये बहुतांश लोकांकडे असे नकाशे उपलब्ध आहेत की नाहीत, याचा विचार न करताच हा नवीन नियम लागू केल्यामुळे एक प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पोटहिश्श्याच्या नकाशाची सक्ती

याउलट, शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये २००२ पासून जमिनीच्या पोटहिश्श्यांची व्यवस्थित मोजणी करून लोकांना त्याचे नकाशे देण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे हा नियम सहजपणे लागू झाला आहे. जमिनीच्या मालकीबद्दल प्रत्येकजण अत्यंत संवेदनशील असतो. अगदी सहोदर भावांच्या वाटणीच्या जमिनीमध्येही बांधावरून गंभीर स्वरूपाचे वाद आणि खूनखराबीच्या घटना घडल्या आहेत. जमीन खरेदी करताना आतापर्यंत विशेषतः पोटहिश्श्याच्या नकाशाची मागणी सहसा केली जात नव्हती. जमीन विक्रेता जागेवर जाऊन अंदाजे जमीन दाखवत असे. मात्र, खरेदी व्यवहार पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष जमिनीचा ताबा घेताना शेजारच्या लोकांशी वाद निर्माण होत असत. यातून अनेक गुन्हे दाखल होऊन पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या वाऱ्या सुरू होत.

नवीन जमीन खरेदी विक्री करत असाल तर शासनाचा

हा नवीन नियम जाणून घ्या

या सर्व प्रकारच्या संभाव्य समस्या टाळण्यासाठी, खरेदी दस्तालाच पोटहिश्श्याचा अचूक चतुःसीमा (चार बाजूंची हद्द) दर्शवणारा अधिकृत नकाशा जोडला गेला, तर जागेवर जमिनीचा ताबा घेताना कोणतीही अडचण येणार नाही, असा या कायद्यामागचा शासनाचा चांगला उद्देश आहे. परंतु, आपल्याकडे आजही मूळ मोठ्या गटाच्या जमिनीचे नकाशे उपलब्ध आहेत. त्या नकाशातून नंतर झालेल्या खरेदीनुसार विशिष्ट क्षेत्राचे (उदा. ‘पैकी… इतके क्षेत्र’) स्वतंत्र नकाशे तयार केलेले नाहीत.

नवीन जमीन खरेदी विक्री करत असाल तर शासनाचा

हा नवीन नियम जाणून घ्या

खरे तर, भूमिअभिलेख विभागाकडे हे नकाशे तयार करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही आणि या विभागानेही याकडे कधी गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. दुसरीकडे, सामान्य लोकांनीही असे स्वतंत्र नकाशे करून घेण्याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता परिस्थिती अशी आहे की, जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या एक एकर जमिनीतील केवळ २० गुंठे क्षेत्र विकायचे असेल, तर त्या २० गुंठ्यांचा स्वतंत्र नकाशा उपलब्ध नाही. आणि हा नकाशा तयार केल्याशिवाय आता त्याला जमिनीची विक्री करता येणार नाही. यामुळे जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

Leave a Comment