LPG new rates नमस्कार मित्रांनो आज आपण घरगुती सिलेंडर गॅस बद्दल माहिती घेणार आहोत. आपण घरात जो सिलेंडर गॅस वापरतो त्याला एलपीजी (LPG) असे म्हटले जाते. लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस Liquefied petroleum gas. हा गॅस सर्व घरांमध्ये आता महत्त्वाचा भाग बनलेला आहे. जेवण बनवण्यासाठी आपण आता गॅसचा उपयोग करतो.
मित्रांनो पूर्वी लाकूड, कोळसा, रॉकेल अशा विविध पद्धतींचा वापर स्वयंपाक करण्यासाठी होत होता. परंतु यामुळे प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे एलपीजी गॅस हा आता त्यावर एक चांगला उपाय आहे आणि कमी प्रदूषण सुद्धा करतो.
एलपीजी गॅस मध्ये अधिक उष्णता असल्यामुळे त्यावर स्वयंपाक लवकर तयार होतो. एलपीजी गॅस हा लोखंडाच्या सिलेंडर मध्ये दाबून दबाव देऊन भरला जातो आणि रेग्युलेटर च्या साह्याने शेगडीवर ते जाळ देतो. त्यामुळे एलपीजी गॅस वापरणे सुरक्षित आहे.
राज्य सरकार, भारत सरकार आता एलपीजी गॅसचा वापर जास्त वाढवा म्हणून विविध योजना सुरू करत आहे. जशी की “प्रधानमंत्री उज्वला योजना” यामध्ये गरीब घरांना शासनातर्फे खूप कमी स्वस्त दरामध्ये सिलेंडर उपलब्ध करून दिले जाते.
शहरांमध्ये तर सर्व लोक आता एलपीजी गॅसचा वापर करतात आणि ग्रामीण शहरांमध्ये पण सरकारने राबवलेल्या योजनांमुळे आता सर्व लोक एलपीजी गॅस कडे वळत आहेत. पारंपारिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या जेवण जसे की लाकूड, कोळसा, रॉकेल वापरून आता या गोष्टींचा वापर करून जे स्वयंपाक बनवणे कमी होत आहे.
भारतामध्ये काही प्रमुख कंपन्या एलपीजी गॅस देतात जसे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) एचपी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अशा प्रमुख कंपन्या आहेत.
Domestic cylinder rates घरगुती सिलेंडरचे दर
मित्रांनो आता आपण एलपीजी गॅस च्या किमतींबद्दल बोलूया एलपीजी गॅस च्या किमतीवर अनेक गोष्टी प्रभाव पडत असतात आणि दर महिन्याला नवीन दर हे एलपीजी कंपन्या जाहीर करत असततात.
शहर | दर |
अहमदनगर | 816.50 |
अकोला | 823 |
अमरावती | 836.50 |
छत्रपती संभाजी नगर | 811.50 |
भंडारा | 863 |
बीड | 828.50 |
बुलढाणा | 817.50 |
चंद्रपूर | 851.50 |
धुळे | 823 |
गडचिरोली | 872.50 |
गोंदिया | 871.50 |
मुंबई | 802.50 |
हिंगोली | 828.50 |
जळगाव | 808.50 |
जालना | 811.50 |
कोल्हापूर | 805.50 |
लातूर | 827.50 |
मुंबई शहर | 802.50 |
नागपूर | 854.50 |
नांदेड | 828.50 |
नंदुरबार | 815.50 |
नाशिक | 806.50 |
धाराशिव | 827.50 |
पालघर | 814.50 |
परभणी | 829 |
पुणे | 806 |
रायगड | 813.50 |
रत्नागिरी | 817.50 |
सांगली | 805.50 |
सातारा | 807.50 |
सिंधुदुर्ग | 817 |
सोलापूर | 818.50 |
ठाणे | 802.50 |
वर्धा | 863 |
वाशिम | 823 |
यवतमाळ | 844.50 |
एलपीजी गॅस काही प्रमाणात आपल्याला बाहेरून आयात करावा लागतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये कमी जास्त होणारे कच्चे तेलाचे भाव हे एलपीजी गॅसच्या भारतातील दरांना प्रभावित करतात.
एलपीजी गॅस आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमत ही सौदी अरम को कॉन्ट्रॅक्ट प्राईस Saudi Aramco CP ही कंपनी निश्चित करते. जर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये किमती वाढल्या तर भारत देशामध्ये एलपीजी गॅसच्या किमती वाढतात.
जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय आयात करतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय चलन म्हणजे अमेरिकेचे डॉलर यामध्येच आपल्याला व्यवहार करावा लागतो. जर डॉलरची किंमत वाढली आणि रुपयाची घसरली तर आपल्याला अधिक प्रमाणात पैसे द्यावे लागतात. जेणेकरून परत एलपीजींच्या दरांवर परिणाम होतो आणि एलपीजी दर वाढतात.
एलपीजी भारतात आल्यानंतर रिफायनरी मधून आपल्या घरापर्यंत येण्यासाठी त्याला दळणवळण करावी लागते. त्यामध्ये दळणवळण चे पैसे स्टोरेज करण्याचे पैसे डिस्ट्रीब्यूशन करण्याचे पैसे असे विविध प्रकारचे पैसे लागतात आणि या गोष्टींचा परिणाम आहे एलपीजीच्या भावावर होतो. घरगुती एलपीजी सिलेंडर वर जीएसटी लागत नाही.
घरगुती आणि व्यवसाय एलपीजी सिलेंडर मध्ये काय फरक असतो, आपण ते पाहू घरगुती सिलेंडर हे 14.2 किलोग्रॅम वजनाच्या असते. घरगुती सिलेंडरवर सरकारतर्फे सबसिडी दिली जाते तसेच व्यावसायिक सिलेंडर हे 19 किलोचे असते किंवा अधिक असू शकते यावर सरकार कोणतीही सबसिडी देत नाही.