अर्ज करण्याची प्रक्रिया
योजनेसाठी अर्ज प्रक्रिया :
ऑनलाइन असून इच्छुकांनी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे. अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालयात जमा करावी. पात्र अर्जदारांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.
मिनी ट्रॅक्टरवर 3.15 लाखांचे अनुदान अर्ज करण्यासाठी
पात्रता आणि अटी-शर्ती काय आहे?
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
- अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील बचत गटाचा सदस्य असावा.
- बचत गटातील किमान 80% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध समाजातील असणे आवश्यक आहे. गटाचा अध्यक्ष आणि सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा.
- अनुदानाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच ट्रॅक्टर खरेदीस परवानगी Tracter Subsidy दिली जाईल.
- अर्ज संख्येच्या आधारे लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते.