ST Bus Fare Increase | राज्यात एसटीचा प्रवास 15 टक्क्यांनी महागला, नवे दर लागू
MSRTC bus tikit rates 2024 दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीसाठी प्रवास भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. शिवनेरी वगळता इतर सर्व प्रकारच्या बसेसाठी २५ ऑक्टोबरपासून दरवाढ लागू करण्यात आली होती. ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार असल्याने प्रवाशांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ही भाडेवाढ रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एसटी प्रशासनाने प्रवास भाड्यात १० टक्के वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे.