नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
या दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजनेचे 2000 रु
यादीत नाव तपासा
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, PM किसान योजनेच्या पात्र लाभार्थींना वार्षिक ₹६,०००/- तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येक हप्त्यात ₹२,०००/-) अतिरिक्त लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY) सुरू केली आहे.
९ मे २०२५ पर्यंत एकूण ९३.०९ लाख शेतकऱ्यांना (१ ते ६ हप्ते) या योजनेतून एकूण ₹११,१३०.४५ कोटींचा लाभ मिळाला आहे. आता, माहे एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत PM किसान योजनेचा २० वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळेल, त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हप्ता देखील अदा करण्यात येणार आहे.