नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
Namo Shetkari Yojana 7th Installment : नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY) या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना एकत्रितपणे मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.
या दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजनेचे 2000 रु
यादीत नाव तपासा
PM किसान योजना: २० वा हप्ता लवकरच जमा होणार!
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ₹६,०००/- तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येक हप्त्यात ₹२,०००/-) थेट बँक खात्यात मिळतात. महाराष्ट्रात ९ मे २०२५ पर्यंत एकूण १२३.७८ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली आहे. त्यापैकी, ११८.५९ लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत (१ ते १९ हप्ते) एकूण ₹३५,५८६.२५ कोटींचा लाभ मिळाला आहे.
PM किसान योजनेचा माहे एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीतील २० वा हप्ता केंद्र शासनाने बंधनकारक केलेल्या तिन्ही बाबींची पूर्तता केलेल्या लाभार्थ्यांना जून २०२५ मध्ये अदा करण्यात येणार आहे. Namo Shetkari Yojana 7th Installment
या दिवशी जमा होणार नमो शेतकरी योजनेचे 2000 रु
यादीत नाव तपासा
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना: PM किसान सोबत आणखी ₹६,०००/-
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी, PM किसान योजनेच्या पात्र लाभार्थींना वार्षिक ₹६,०००/- तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येक हप्त्यात ₹२,०००/-) अतिरिक्त लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना (NSMNY) सुरू केली आहे.
- ९ मे २०२५ पर्यंत एकूण ९३.०९ लाख शेतकऱ्यांना (१ ते ६ हप्ते) या योजनेतून एकूण ₹११,१३०.४५ कोटींचा लाभ मिळाला आहे. Namo Shetkari Yojana 7th Installment
- आता, माहे एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीत PM किसान योजनेचा २० वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळेल.
- त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ७ वा हप्ता देखील अदा करण्यात येणार आहे.
- या दोन्ही योजनांमुळे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण ₹१२,०००/- चा आर्थिक आधार मिळेल.
- जो त्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.