newlist
देशभरातील जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे. त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत. पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.
तुमचे केवायसी पूर्ण झाले आहे की नाही याची तुम्हाला खात्री नसल्यास, ते तपासण्याचा एक मार्ग आहे. तुमचा KYC स्थिती तपासण्यासाठी तुम्ही मेरा राशन 2.O ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकू शकता किंवा तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवलेल्या OTP द्वारे देखील स्थिती तपासू शकता.