केंद्र सरकारने या वर्षी, म्हणजे जानेवारी 2025 मध्ये, आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे. आता, वेतन आयोगाच्या निर्मिती आणि कामकाजासाठी सरकारने 35 पदांचा तपशील जारी केला आहे. ही पदे प्रतिनियुक्तीद्वारे भरण्यात येणार आहेत. म्हणजेच, या पदांवर नियुक्त व्यक्ती वेतनासंबंधीचे कामकाज करतील. आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य कोण असतील, याचा निर्णय लवकरच होईल, अशी अपेक्षा आहे. अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने कर्मचाऱ्यांचा तपशील जाहीर केला आहे.
मोदी सरकार करणार आठवा वेतन आयोग लागू
येथे पहा सविस्तर माहिती
आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील. वेतन आयोग आपले कामकाज सहा ते सात महिन्यांत पूर्ण करून अहवाल तयार करेल. त्यानंतर, सरकार या अहवालाचा आढावा घेऊन त्याची अंमलबजावणी करेल. हा कालावधी फक्त सहा ते सात महिन्यांचा असल्याने, सरकारला खूप वेगाने काम करावे लागणार आहे.