मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, आता सुधारित पद्धतीने पीक विमा योजना लागू केली जाणार आहे.
या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार पिक विमा योजनेचा लाभ
मागील काळात पीक विमा योजनेत अनेक त्रुटी आणि कथित घोटाळे समोर आले होते. एक रुपयात पीक विमा योजना सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात अपात्र अर्ज (बोगस अर्ज) दाखल झाले, ज्यामुळे सरकारी तिजोरीतील हजारो कोटी रुपयांचा गैरवापर झाला. यामुळे गरजू शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.