या योजनेचे पैसे कोणाला मिळणार?
शेतकरी मित्रांनो, यापूर्वी तुम्हाला PM किसान योजनेचे १८ ते १९ हप्ते आणि नमो शेतकरी योजनेचे ५ ते ६ हप्ते प्राप्त झाले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे हे पैसे वेळेवर मिळू शकले नाहीत.
पीएम किसान योजनेचे – इथे तुमचे स्टेटस चेक करा
नमो शेतकरी योजनेचे – इथे तुमचे स्टेटस चेक करा
आता पुढील हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला खालील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी करणे अनिवार्य आहे:
- KYC (नो युवर कस्टमर) पूर्ण करा: KYC म्हणजे बँकेला तुमची ओळख पटवून देणे. जर तुम्ही हे प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला या योजनांचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे त्वरित तुमच्या बँकेत जा आणि KYC ची प्रक्रिया पूर्ण करा.
- बँक खात्याला आधार लिंक करा: तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचे खाते अजूनही आधारशी लिंक नसेल, तर त्वरित बँकेत जाऊन ते लिंक करून घ्या.
- शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) काढा: Farmer ID हे शेतकऱ्यांसाठी असलेले एक विशिष्ट ओळखपत्र आहे. यामध्ये तुमचे नाव, जमिनीची माहिती, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर इत्यादी सर्व तपशील समाविष्ट असतात. हे ओळखपत्र नसल्यास तुम्हाला पीक विमा, खत अनुदान किंवा हप्त्यांसारख्या कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. तुमच्याकडे Farmer ID नसेल, तर तातडीने तुमच्या गावातील तलाठी किंवा कृषी विभागात संपर्क साधून ते तयार करून घ्या.