PM Kisan Yojana
PM Kisan Samman Nidhi List : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हप्ते जमा झाले आहेत, आणि आता सर्वांचे लक्ष 19व्या हप्त्याच्या वाटेकडे लागले आहे. केंद्रीय सरकारने २४ फेब्रुवारी रोजी बिहार दौऱ्यावर असताना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली आहे.
eKYC प्रक्रिया त्वरित पूर्ण करा :
PM योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पीएम किसान १८ वा हप्ता जारी केला होता आणि आता २४ फेब्रुवारीला १९ वा हप्ता (आत्तापर्यंतचे 38000 रुपये) जारी करण्यात येईल. त्यासाठी, शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योजना थेट त्यांच्या बँक खात्यात पोहोचेल आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळला जाईल, ज्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल. त्यामुळे, लवकरात लवकर ई-केवायसी करणे आवश्यक आहे.