RBI New Update : नमस्कार मित्रांनो, अनेकदा एटीएममध्ये पैसे काढायला गेल्यावर तुम्हाला हव्या असलेल्या लहान नोटा (१००, २०० रुपये) उपलब्ध नसतात आणि नाइलाजाने ५०० रुपयांची नोट काढावी लागते. तुमच्या याच समस्येवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व्ह बँकेचा नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय
रिझर्व्ह बँकेने सर्व बँका आणि एटीएम सेवा पुरवठादार संस्थांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, एटीएममध्ये १०० रुपये आणि २०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा अधिक प्रमाणात ठेवावा. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना लहान रकमेच्या नोटा सहज उपलब्ध होणार आहेत.
सोमवारी जारी केलेल्या या निर्देशांनुसार, बँकांना आता एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा नियमितपणे भरण्याची गरज आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, सर्वसामान्यांसाठी या नोटा सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे.
रिझर्व्ह बँकेचा नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय
रिझर्व्ह बँकेने काढलेल्या आदेशानुसार, बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्संना (WLAOs) याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करायची आहे. व्हाईट लेबल एटीएम हे खाजगी संस्थांद्वारे चालवले जातात. आरबीआयच्या निर्देशानुसार, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत एकूण एटीएमपैकी ७५ टक्के एटीएममध्ये कमीतकमी एका कॅसेटमध्ये १०० रुपये किंवा २०० रुपयांच्या नोटा असणे अनिवार्य आहे. एका कॅसेटमध्ये साधारणपणे अडीच हजार नोटा असतात आणि एका एटीएममध्ये साधारणतः चार ते सहा कॅसेट्स असतात. पुढील टप्प्यात, ३१ मार्च २०२६ पर्यंत ९० टक्के एटीएममध्ये एका कॅसेटमध्ये १०० रुपये किंवा २०० रुपयांच्या नोटा असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिले आहेत.